रिअलमी C71 5G मध्ये स्लिम डिझाईन, ड्युअल रियर कॅमेरा आणि ग्लोइंग पल्स लाइट सिस्टीम आहे
Realme C71 5G मध्ये 6,300mAh क्षमतेची प्रचंड बॅटरी दिली आहे, जी ₹8,000 च्या खालील स्मार्टफोनमध्ये सर्वात मोठी आहे. फोन केवळ 7.94mm जाडीचा असून 6W रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देखील मिळतो. कंपनीनुसार, एकदा चार्ज केल्यावर दोन दिवसांपर्यंत बॅटरी टिकते.
हा फोन Unisoc T7250 ऑक्टा-कोर प्रोसेसरसह येतो, जो 12nm प्रोसेसवर आधारित आहे. GPU म्हणून Mali-G57 वापरण्यात आला आहे. फोन Android 15 वर चालणाऱ्या Realme UI सह येतो आणि त्यात RAM Expansion सपोर्ट आहे, त्यामुळे मल्टीटास्किंग अधिक स्मूद होते.
Realme C71 मध्ये खास Pulse Light सिस्टीम आहे जी कॉल, मेसेज, आणि चार्जिंगसारख्या घटनांवर रिस्पॉन्ड करते. यात 9 रंग आणि 5 लाइटिंग मोड मिळतात, जे फोनचा लूक खास बनवतात.
फोनमध्ये Armor Shell संरक्षण दिले असून तो 1.8 मीटर उंचीवरून पडल्यावरही टिकतो, तसेच 33 किलो दबाव झेलतो. म्हणजेच हा फोन रफ-टफ वापरासाठी योग्य आहे.
Realme C71 मध्ये 13MP चा Omnivision OV13B रियर कॅमेरा PDAF फोकससह आहे. समोर 5MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. दोन्ही कॅमेरे FHD व्हिडीओ रेकॉर्डिंग सपोर्ट करतात. यात Dual-view video, Pro Mode आणि AI टूल्सही दिले आहेत.
फोनमध्ये 300% Ultra Volume मोड आणि AI Call Noise Reduction 2.0 सपोर्ट मिळतो, जेणेकरून कॉल दरम्यान आवाज अधिक स्पष्ट राहतो.
फोन Flipkart, realme.com आणि ऑफलाइन स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे.
Realme C71 5G कमी बजेटमध्ये 5G, मोठी बॅटरी, Android 15 आणि मजबुत डिझाईनसह येतो. ₹8,000 च्या खाली हा फोन अत्यंत चांगला पर्याय ठरू शकतो.
Motorola Edge 70 Fusion मध्ये 144Hz AMOLED डिस्प्ले, Snapdragon 7s Gen 4 चिपसेट, 50MP Sony कॅमेरा आणि 7,000mAh बॅटरी दिली…
Vivo ने आपला नवीन स्मार्टफोन Vivo X200T भारतात 27 जानेवारी 2026 रोजी लॉन्च केला आहे. हा फोन कंपनीच्या X-सीरीजमध्ये नवीन…
तुम्ही मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोन शोधत आहात का? Amazon वर Oppo K13 Turbo वर मोठी सवलत मिळत आहे. या फोनची…
Realme 16 Pro सिरीजचा पहिला सेल आज दुपारी 12 वाजता सुरू! 200MP कॅमेरा आणि 7000mAh बॅटरी असलेल्या या स्मार्टफोनवर मिळवा…
itel ने भारतात लाँच केला आपला सर्वात मजबूत बजेट स्मार्टफोन Zeno 20 Max. फक्त ₹5,799 च्या सुरुवातीच्या किमतीत मिलिटरी ग्रेड…
Xiaomi ने भारतात Redmi Note 15 5G लाँच केला आहे. 108MP कॅमेरा, कर्व्ड AMOLED डिस्प्ले आणि शक्तिशाली प्रोसेसरसह सज्ज असलेल्या…