Infinix ने आपला नवीन बजेट स्मार्टफोन, Infinix Smart 10, भारतात अधिकृतपणे लॉन्च केला आहे. कमी किमतीत जास्त फीचर्स देणारा हा फोन चार वर्षांच्या लेग-फ्री परफॉर्मन्सचा दावा करतो. IP64 रेटिंगसह येणाऱ्या या फोनमध्ये दमदार बॅटरी, AI व्हॉईस असिस्टंट आणि नेटवर्कशिवाय कॉल करता येणारा UltraLink फीचरदेखील दिला आहे.
भारतातील किंमत
Infinix Smart 10 च्या 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत ₹6,799 ठेवण्यात आली आहे. हा फोन Iris Blue, Sleek Black, Titanium Silver आणि Twilight Gold या चार रंगांमध्ये येतो. 2 ऑगस्टपासून Flipkart आणि ऑफलाइन स्टोअर्समध्ये उपलब्ध होणार आहे.
डिस्प्ले आणि डिझाइन
या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच HD+ (720×1600 पिक्सेल्स) IPS LCD डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, 700 निट्स ब्राइटनेस आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. फोन IP64 प्रमाणित असून तो धूळ आणि पाण्याच्या हलक्या शिंतोड्यांपासून सुरक्षित आहे.
प्रोसेसर आणि परफॉर्मन्स
फोनमध्ये ऑक्टा-कोर Unisoc T7250 प्रोसेसर दिला आहे. यासोबत 4GB LPDDR4x RAM आणि 64GB स्टोरेज आहे. स्टोरेज microSD कार्डद्वारे 2TB पर्यंत वाढवता येते. याला TÜV SÜD सर्टिफिकेशन मिळाले आहे, जो चार वर्षांच्या लेग-फ्री वापराचा दावा करतो.
सॉफ्टवेअर आणि AI फीचर्स
फोन Android 15-आधारित XOS 15.1 वर चालतो. यात Infinix च्या AI फीचर्सचा समावेश आहे जसे की Folax AI व्हॉईस असिस्टंट, Document Assistant, आणि Writing Assistant. हे टूल्स युजर्सचा डे टू डे अनुभव अधिक प्रभावी बनवतात.
कॅमेरा फिचर्स
या फोनमध्ये 8-मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा दिला आहे. दोन्ही कॅमेरे 2K व्हिडिओ 30fps वर शूट करू शकतात. ड्युअल व्हिडिओ मोडसह व्लॉगिंगसाठी हे डिव्हाईस उत्तम आहे.
बॅटरी आणि चार्जिंग
Infinix Smart 10 मध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट दिला आहे.
कनेक्टिव्हिटी आणि इतर फिचर्स
फोनमध्ये 4G, Wi-Fi, Bluetooth, GPS, FM रेडिओ आणि OTG सपोर्ट आहे. UltraLink फीचरच्या साहाय्याने नेटवर्क नसतानाही इतर Infinix फोनवर कॉल करता येतो. फोनचं वजन 187 ग्रॅम असून माप 165.62 x 77.01 x 8.25mm आहे. यामध्ये DTS ट्यून केलेले ड्युअल स्पीकर्सदेखील आहेत.





