Xiaomi ची सब-ब्रँड Redmi लवकरच Turbo 5 सिरीज घेऊन येऊ शकते. या सिरीजमध्ये Turbo 5 आणि Turbo 5 Pro हे दोन फोन लॉन्च होण्याची शक्यता आहे. याआधी Pro मॉडेलबद्दल काही लीक माहिती समोर आली होती आणि आता Turbo 5 च्या महत्त्वाच्या फिचर्सची माहिती टिपस्टर Digital Chat Station ने शेअर केली आहे.
Redmi Turbo 5 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले
Redmi Turbo 5 मध्ये 6.6-इंचाचा मोठा डिस्प्ले मिळू शकतो ज्यात 1.5K रिझोल्यूशन आणि उच्च रिफ्रेश रेट असेल. या डिस्प्लेमध्ये “Large R-Angle” डिझाईन असेल, म्हणजे कोपरे अधिक वक्र असतील, ज्यामुळे अधिक प्रीमियम अनुभव मिळेल.
डिझाईन
लीकनुसार, या फोनमध्ये मेटल मिड फ्रेम दिला जाईल, जो याला मजबूत आणि प्रीमियम फील देईल. याआधीच्या Turbo 4 मध्ये प्लास्टिक फ्रेम होता, त्यामुळे हे मोठं अपग्रेड ठरेल.
बॅटरी आणि चार्जिंग
बॅटरीबाबतही अपग्रेड होण्याची शक्यता आहे. Turbo 4 मध्ये 6,550mAh ची बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंग होती. पण Turbo 5 मध्ये अधिक मोठी बॅटरी आणि पतळं डिझाईन एकत्र पाहायला मिळेल.
Redmi Turbo 5 Pro चे संभाव्य तपशील
अगोदरच झालेल्या लीकनुसार, Redmi Turbo 5 Pro मध्ये 8,000mAh पेक्षा मोठी बॅटरी मिळू शकते. याचा लाँच 2026 च्या एप्रिल ते जून दरम्यान होण्याची शक्यता आहे, तर Turbo 5 चे लाँच 2026 च्या सुरुवातीस अपेक्षित आहे.
ग्लोबल मार्केटसाठी Poco ब्रँडिंग
Turbo 5 ग्लोबली Poco X8 Pro म्हणून आणि Turbo 5 Pro ला Poco F8 म्हणून रीब्रँड केले जाऊ शकते. त्यामुळे भारतीय आणि जागतिक बाजारात ही सिरीज वेगळ्या नावाने सादर होऊ शकते.
Redmi Turbo 5 सिरीजमध्ये प्रीमियम डिझाईन, मेटल बॉडी आणि जबरदस्त बॅटरी बॅकअप मिळण्याची शक्यता आहे. 2026 मध्ये लॉन्च होणाऱ्या या सिरीजकडून मिड-रेंज सेगमेंटमध्ये क्रांती घडवण्याची अपेक्षा आहे.





